देवेन्द्रजी आता तुम्हीच लक्ष द्या चंद्रपूरकडे ! अहिर यांची आग्रही विनंती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०२ सप्टेंबर २०२१

देवेन्द्रजी आता तुम्हीच लक्ष द्या चंद्रपूरकडे ! अहिर यांची आग्रही विनंती

चंद्रपूर : येत्या सात महिन्यांनी चंद्रपूर महानगरपालिकेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिल्लक असलेल्या काळात उरलेली कामे करण्यावर पदाधिकाऱ्यांचा भर आहे. तर दुसरीकडे मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. या पदासाठी रस्सीखेच सुरु असल्याने सत्ताधारी भाजपात दोन गट पडण्याची शक्यता आहे. किंबहुना दोन गट पडलेही असावेत. मनपात वसंत फुलविण्यासाठी एक गट विरोधकांच्या पाठिब्यासह उभा आहे, तर दुसरा गट आपली वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे. तशा बातम्या देखील प्रादेशिक दैनिकांत प्रकाशित झाल्या. यातच माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी देवेंद्र_फडणवीस_जी यांची भेट घेऊन चर्चा केली. देवेन्द्रजी आता तुम्हीच लक्ष द्या चंद्रपूरकडे ! अशी आग्रही विनंती अहिर यांनी केल्याने भाजपात नक्की काहीतरी ठिणगी पेटली आहे, हे नक्की. एकतर्फी राजकारण, भविष्यात जिल्ह्यातील भाजपच्या संघटनांवर येणारी दुफळी, मनपाच्या निवडणूकवर होणारे बदल, यावर होणारे परिणाम टाळण्यासाठी ही पोटतिडकीने भेट घेतल्याचे सध्यातरी दिसत आहे.    BJp Hansraj Ahir Meet Devendra Fadanvis


अहिर यांनी आपल्या फेसबुकवर जी पोस्ट केली आहे, त्यात ते म्हणतात, "देवेंद्रजी पूर्व मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता सोबतच कुशल संघटक आहेत म्हणून त्यांना चंद्रपूर जिल्हा केंद्रस्थानी भेट देऊन पक्ष संघटनेबाबत चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी अशी आग्रही विनंती केली". यावरून चंद्रपूर भाजपत संघटन विस्कळीत होत आहे, हे स्पष्ट होते. शिवाय चंद्रपूर जिल्हा केंद्रस्थानी भेट देऊन पक्ष संघटनेबाबत चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी विनंती केल्याने भाजपत संघविघटन झाले आहे, हे नक्की!


हंसराज अहिर यांनी यापूर्वीही आपली भूमिका स्पष्टपणे व्यक्त केली आहे. त्यांची ही जुनी पोस्ट नक्की वाचा. 

आणि मी 23 मे 2019 ला #चंद्रपूर_लोकसभेत पराभुत झालो

महाराष्ट्रात एकमेव जागी काँग्रेस पक्ष विजयी झाला?

आम्ही पाचव्यांदा #चंद्रपूरात जनमान्य #भाजपाला विजयी करू शकलो नाही #क्षमस्व

- हंसराज अहीर


  BJp Hansraj Ahir Meet Devendra Fadanvis