नवेगावबांध येथे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त बोरवेलचे भूमिपूजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२२ सप्टेंबर २०२१

नवेगावबांध येथे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त बोरवेलचे भूमिपूजन

 नवेगावबांध येथे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त  बोरवेलचे भूमिपूजन
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध ता.22 सप्टेंबर:-

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या ७१व्या. वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून जयंती माह साजरा करण्यात येत आहे.केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरात बोअरवेल खोदकामाचे भूमीपुजन नवेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे यांचे शुभ हस्ते पार पडले . अध्यक्षस्थानी उपसरपंच  रघुनाथ लांजेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. टंडन, डॉ. लोथे, जल शक्ती विभाग नागपूर युनीट क्र.६चे डीआयसी  फागोराम, युनिट इन्चार्ज नीमजे, मेडिकल सुपरीटेंन्डन असिस्टंट  रंगारी,  एक्स -रे तंत्रज्ञ रिनाईत ,आरोग्य कर्मचारी मेश्राम तसेच जलशक्ती विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. शुध्द पेयजल उपलब्ध होणार असल्याने ग्रामवासीयांनी आनंद व्यक्त केला आहे.