ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनतर्फे तुकडोजी पुतळा चौक नागपुर येथे ध्वनी प्रदूषणाविरुध्द जनजागृती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ सप्टेंबर २०२१

ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनतर्फे तुकडोजी पुतळा चौक नागपुर येथे ध्वनी प्रदूषणाविरुध्द जनजागृती

🙏🏻माजी आमदार प्रा. अनिल सोले अध्यक्ष असलेल्या 🌳 ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन 🌳  ह्या संस्थेद्वारे पर्यावरण रक्षणाकरिता गेल्या ६ वर्षांपासून बरेच उपक्रम राबविले जात आहेत, त्याचाच एक भाग  #ध्वनी #प्रदूषण कमी व्हावे म्हणून जनजागृतीचा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे,    Awareness against noise pollution at Tukdoji Statue Chowk Nagpur by Green Earth Organization

🙏🏻या अंतर्गत रविवार दि ५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून सकाळी 10 ते 11.30 वाजता तुकडोजी पुतळा चौक नागपुर येथे ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन, भाजपा सहकार आघाडी च्या कार्यकर्त्यांनी  परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत  वाहन चालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून ध्वनी प्रदूषण रोखणे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे याबाबत वाहनधारकांशी संवाद साधून त्यांच्या वाहनांना जनजागृतीसाठी स्टिकर्स लावलेत.

कार्यक्रमाच्या सफलतार्थ ग्रिन अर्थ ऑर्गनायझेशन, भाजपा सहकार आघाडी आणि भाजपा स्वच्छ भारत अभियान पुर्व नागपुर च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भरभरून प्रयास केले. 
Awareness against noise pollution at Tukdoji Statue Chowk Nagpur by Green Earth Organization