नवेगावबांध येथे अंगणवाडी सेविकांनी केले विविध ठिकाणी वृक्षारोपण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०८ सप्टेंबर २०२१

नवेगावबांध येथे अंगणवाडी सेविकांनी केले विविध ठिकाणी वृक्षारोपण

 नवेगावबांध येथे अंगणवाडी सेविकांनी केले विविध ठिकाणी वृक्षारोपणसंजीव बडोले प्रतिनिधी

नवेगावबांध ता.8 सप्टेंबर:-

महाराष्ट्र शासनाच्या पोषणमाह अभियानाअंतर्गत नवेगाव बांध येथील अकरा अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून दिनांक चारला विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

बाल विकास प्रकल्प अंतर्गत पोषणमाह चे औचित्य साधून नवेगावबांध येथील अकरा अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तलाठी कार्यालय परिसरात वृक्षारोपण प्रसंगी तलाठी कुंभरे , पांढरवाणी चे तलाठी चचाने , जेष्ठ महिला कार्यकर्त्या सत्यभामा कोसरकर, सामाजिक कार्यकर्ता सतीश कोसरकर,आनंद काशिवार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .त्याचप्रमाणे बिरसा मुंडा परिसर, सार्वजनिक हनुमान मंदिर परिसर, आदिवासी गोवारी समाज परिसर, ग्रामपंचायत परिसर आदी ठिकाणी महिलांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले .याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जागेश्वर मलये, चामेश्वर राऊत ,हिवराज नाईक यांनी वृक्षारोपण प्रसंगी विशेष सहकार्य केले. अंगणवाडी सेविका टीना कापगते, आशा जुगादे ,रीना बोळणकर ,कांता डोंगरवार ,पुष्पा धार्मिक ,वर्षा तिमांडे, योगिता टेंभुर्णे, धणिता बावनकर ,कुंदा पंचभाई, सुषमा मडावी ,विमल कापगते, तर अंगणवाडी मदतनीस माया पवार, तिर्था नेवरे, वच्छला वरकडे ,माधुरी सरजारे ,कुसुम राऊत, ऊषा मुनेश्वर, लता आरसोळे ,आदींनी विशेष परिश्रम घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम सफल के