खंडणी प्रकरणी अक्षय बोराडे यांस अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०१ सप्टेंबर २०२१

खंडणी प्रकरणी अक्षय बोराडे यांस अटक
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर येथील व्यावसायिकास फोन करुन पैसे देतोस की नाही तर जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी मागितल्या प्रकरणी अक्षय मोहन बोराडे यास जुन्नर पोलिसांनी अटक केली.

व्यावसायिक रुपेश प्राणलाल शहा यांचे जुन्नर येथे गँस एजन्सी आहे. शहा यांच्या विरोधात अक्षय बोराडे यांनी  तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात माहिती अधिकारात नागरी वस्तीत गँस गोडावून कसे याबाबत माहिती मागितली होती.
तसेच  शहा यांच्या आँफिसमध्ये दोन साथीदारांना पाठवून पैशाची मागणी केली होती. तसेच शहा फोन करुन माझी माणसे पाठवलीआहेत. त्यांच्याकडे पैसे दे. 
   तसेच वेळोवेळी माझूया संस्थेमध्ये येणारा खर्च  तूला द्यावा लागेल ,नाहीतर मी तुझ्या विरोधात फेसबुक लाईव्ह करुन तुझा व्यवसाय कसा चालतो ते बघून घेईल अशी धमकी दिली. याबाबत फिर्यादी रुपेश शहा यांनी आरोपीस प्रतिसाद न दिल्याने ,आरोपीने माहे जून २०२१ मध्ये फोन करुन पैशाची  मागणी करुन ,तू जर पैसे दिले नाही तर ,तुला मी कोण आहे ,माझा मागे किती लोक आहेत .ते तूला सांगावे लागेल का, तुझा गेम कधी कधी करेन  हे तुला कळणार सुद्धा नाही. अशी धमकी देवून खंडणी मागितल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. याबाबत पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पाटील अधिक तपास करत आहेत.

Akshay Borade arrested in ransom case