3 विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२५ सप्टेंबर २०२१

3 विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण

चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण 3 विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. 713 व्या रँकने सावली येथील देवव्रत वसंतराव मेश्राम परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. देवव्रत सावली येथील विश्वशांती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स्व. वसंतराव मेश्राम यांचे चिरंजीव आहे. सावली तालुका आणि जिल्हाभरातून देवव्रत याच्या यशाचे कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.

जिल्ह्यातील तीन युवक चमकले यूपीएससी परीक्षेत, आदित्य चंद्रभान जीवने, अंशुमन यादव, चंद्रपूर आणि देवव्रत मेश्राम, सावली, अशी आहेत उत्तीर्ण झालेल्या युवकांची नावे, सर्वोच्च नागरी सेवा परीक्षेत एकाचवेळी तीन विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना, अथक परिश्रम आणि देशसेवा करण्याचा संकल्प, विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या लौकिकात टाकली मोलाची भर