प्रकाश कापगते यांचे दुःखद निधन आज सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ सप्टेंबर २०२१

प्रकाश कापगते यांचे दुःखद निधन आज सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार

प्रकाश कापगते यांचे दुःखद निधन
आज सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार
संजीव बडोल प्रतिनिधी.

नवेगावबांध ता.१५ सप्टेंबर:-
प्रकाश रामदास कापगते वय ५५ वर्षे, राहणार धाबेपवनी यांचे अल्पशा आजाराने काल दि.१४ ला दुपारी १.३० वाजता उपचारादरम्यान भंडारा येथे रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते १९८९ पासून २०१७ पर्यंत धाबेपवनी येथेच स्वामी विवेकानंद आदिवासी आश्रम शाळा येथे प्राथमिक मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सप्टेंबर २०१७ पासून ते संत जयरामदास आदिवासी आश्रम शाळा कामठा येथे कार्यरत होते. सुस्वभावी प्रकाश कापगते यांच्या अवकाळी निधनाने कापगते कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी मंगला, मुलगा डॉ. राहुल, मुलगी डॉ. स्नेहल व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.१५) सकाळी १०.०० वाजे पवनी/धाबे येथे स्थानिक स्मशानघाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.