माजी जि. प. अध्यक्षांवर गुन्हा दाखल; गर्दी जमवून लग्न समारंभ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ ऑगस्ट २०२१

माजी जि. प. अध्यक्षांवर गुन्हा दाखल; गर्दी जमवून लग्न समारंभ

Zp ex President Crime Wedding Covid19


 जुन्नर येथे माजी जि. प अध्यक्षांवर गुन्हा दाखल

 जुन्नर /आनंद कांबळे 

जुन्नर येथील एका मंगल कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून लग्न समारंभ केल्यामुळे माजी जि.प अध्यक्ष देवराम लांडे व इतर पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 याबाबतची हकिकत अशी की,देवराम लांडे यांनी आपल्या दोन मुलांचे विवाह मोठ्या धुमधडाक्यात बारव येथील मंगल कार्यालयात शनिवारी ( ता. २८) केले.

 या कार्यक्रमास मर्यादेपेक्षा जास्त सुमारे १८०० ते २००० लोकांची गर्दी  जमवलेली होती. महाराष्ट्र  तसेच देशात ,आंतरराष्ट्रीय स्तरावर संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव चालू आहे हे माहित असून त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश लागू असताना  लग्न समारंभास जमाव जमविल्याप्रकरणी भादवि कलम १८८,२६९,२७० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .याबाबत शासनाच्या वतीने पोलिस अंमलदारअमोल शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.


Zp ex President Crime Wedding Covid19