जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्य छायाचित्रकार दिन साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० ऑगस्ट २०२१

जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्य छायाचित्रकार दिन साजरावरोरा (प्रतिनिधी)
: वरोरा येथे जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र फोटो स्टुडिओचे संचालक शिरीष उगे यांनी स्टुडिओ मधे केक कापून छायाचित्रकार दिन साजरा केला तर कोरोना मुळे मृत्यू झालेल्या युवा व जेष्ठ छायाचित्रकार यांना श्रद्धांजली वाहिली.
या दिनी जिल्ह्यातीलच नव्हे तर तालुक्यातील सुद्धा देशातील सर्व बंधू एकत्र येतात आणि जागतिक छायाचित्रकार दिन आनंदोत्सवात साजरा करत असतात. परंतु याही वर्षी कोविड19 या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे आपण आपल्या मोठ्या कार्यक्रमांना मुकलो. परंतु थोडक्यातच काहोईना जागतिक छायाचित्रकार दिन विशेष केक कापून महाराष्ट्र फोटो स्टुडिओ मध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. व कोरोना मुळे मृत्यू झालेल्या जेष्ठ व युवा फोटोग्राफर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र फोटो स्टुडिओ चे मुख्यसंचालक शिरीष उगे, जेष्ठ फोटोग्राफर लोमेश थुल, एन. के. कलेक्शनचे संचालक नितीन भोजेकर, आराध्या सेलिब्रेशनचे संचालक अमोल माणुसमारे, मोरया नेट कॅफे चे संचालक मिलिंद बाकडे, पेंटर आर्टिस्ट सचिन गुज्जर, नैतिक देवाळकर प्रामुख्याने उपस्थित होते.