३१ ऑगस्ट २०२१
नागपूर - भटक्या विमुक्तांच्या ६९ वा स्वातंत्र्यदिन विमुक्त दिन भारताच्या मध्यभागी साजरा करुन हक्क अधिकाराची लढाई अधिक धारदार करण्याचा संकल्प संघर्ष वाहिनी व विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषद (अ.भा) च्या सर्व कार्यकर्त्यांनी सोडला.*
सोलापूर सेटलमेंट अंतर्गत ३१ ऑगस्ट १९५२ रोजी गुन्हेगारी जमात ठरविलेल्या भटक्या विमुक्त जमातींना मुक्त करण्यात आले होते. तेव्हापासून भटक्या विमुक्तांचा स्वातंत्र्यदिन म्हणून ३१ ऑगस्ट हा विमुक्त दिन साजरा करण्यात येतो. यंदाचा ६९ वा विमुक्त दिन साजरा करीत असला तरी अद्यापही भटक्या विमुक्तांच्या समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे आजही भटक्या विमुक्तांना मुलभूत हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. *शासनाने भटक्या विमुक्तांच्या मुलभूत हक्क अदा करुन सन्मानाने जिवन जगता यावं यासाठी व्यापक धोरण आखावे, अशी अपेक्षा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी संघर्ष वाहिनीचे संघटक दिनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, खिमेश बढिये, किशोर सायगन, राजेंद्र बढिये, दिनेश गेटमे, पुरुषोत्तम भोयर, सुदाम राठोड, धिरज भिसीकर, रोहित भगत, राजूभाऊ चव्हाण, विजू राठोड, श्रीकांत राठोड, नागेश चव्हाण यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन धीरज भिसीकर यांनी तर आभार दिनेश गेटमे यांनी मानले.
VjnT Zero miles Nagpur
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
