चालकाविना सुसाट वेगाने जाणाऱ्या बुलेटचा थरार | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत११ ऑगस्ट २०२१

चालकाविना सुसाट वेगाने जाणाऱ्या बुलेटचा थरार |
जुन्नर /आनंद कांबळे

सोमवारी(दि.९) ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या पुणे नाशिक महामार्गावर (On Pune-Nashik highway) चालकाविना सुसाट वेगाने जाणाऱ्या बुलेटचा थरार पहावयास मिळाला.

या घटनेची हकीकत अशी की, नारायणगाव (त.जुन्नर) Narayangaon (Tah. Junnar) येथील एक व्यावसायिक पुणे नाशिक महामार्गावरून बुलेटवर भरधाव वेगाने जात असताना एका पदचाऱ्यास त्यांच्या बुलेटची धडक बसली. आणि बुलेट चालक बुलेटवरून खाली पडला.
तर बुलेट चालकाविना महामार्गावरून तशीच सुमारे तीनशे फूट पुढे गेली. त्यानंतर एक जीपला आडवी जाऊन महामार्गाच्याकडेला पडली. महामार्गावर चालकाविना सुसाट वेगाने जाणारी बुलेट असा थरार काही क्षण पहिला मिळाला. ही घटना महामार्गावर असलेल्या पेट्रोलपंपाच्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चालकाविना धावणारी बुलेट पाहून समोरून येत असलेल्या जीप चालकाने प्रसंगवधान साधून जीप थांबवल्याने अनर्थ टळला. या अपघातात पादचारी जनार्धन दत्तू गांजवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे हात व पाय फ्रॅक्चर असून त्यांना नारायणगाव येथील खाजगी हस्पिटल मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समजते. याप्रकरणी माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात असल्याचे नारायणगाव पोलिस यांचेकडून सांगण्यात आले.

The vibration of a bullet moving at a smooth speed without a driver