विज कोसळल्याने दोघांचा मृत्यू; मुसळधार सरींसह मध्यम पाऊस सुरु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१६ ऑगस्ट २०२१

विज कोसळल्याने दोघांचा मृत्यू; मुसळधार सरींसह मध्यम पाऊस सुरुचंद्रपूर : काही ठिकाणी मुसळधार सरींसह मध्यम पाऊस सुरु असून, विजांचा कडकडाट सुरु आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथे शेतात डवरन करीत असतांना विज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दुपारचा सूमारास घडली. रेखा अरूण घुबडे, मारोती बाबुराव चौधरी अशी मृतकांची नावे आहेत.

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वेडगाव येथिल रेखा अरूण घूबडे यांनी सहा एकर शेती ठेक्याने घेतली. गावापासून जवळच असलेल्या शेतात कापूस पिक उभे आहे. शेतात डवरण करण्यासाठी रेखा घुबडे यांनी गावातील मारोती चौधरी याला बोलाविले.सोबतच दोन मजूर शेतात काम करीत होते.अंदाजे तीन वाजताचा पावसाचे वातावरण झाले.याच दरम्यान शेतात विज कोसळली. या घटनेत रेखा घुबडे,मारोती चौधरी यांच्या दुदैवी मृत्यू झाला.घटनेची माहीती मिळताच गावकर्यांनी धाव घेतली.प्रशासनाला घटनेची माहीती देण्यात आली असून पुढील कार्यवाही सूरू आहे.


Two killed in lightning strike; Moderate rains begin with torrential downpours
chandrapur Gondpimpari

पेज नेव्हिगेशन