जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी; पालकमंत्री जयंतराव पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑगस्ट १७, २०२१

जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी; पालकमंत्री जयंतराव पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार |सांगली - प्रतिनिधी

जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत  तालुक्याला म्हैसाळ विस्तारीकरण योजनेच्या माध्यमातून वारणा प्रकल्पातील ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले बद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंतराव  पाटील यांचा सांगली येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने सत्कार करणेत आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात अनेक योजना झाल्या मात्र जत तालुक्यातील ६५ गावांचा पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. या गावापर्यंत पाणी पोहोचविणे मोठे जिकिरीचे होते. उमदीपर्यंत पाणी गेले होते मात्र पुढे पाणी गेले नव्हते. त्यामुळे या गावांना पाणी मिळावे  ही मागणी तीव्र होत चालली होती.

या भागाला पाणी मिळावे म्हणून  कर्नाटक राज्याशी चर्चा केली मात्र त्यांनी अधिकृत नकार दिला होता. त्यामुळे आपल्यालाच काही नियोजन करायला हवे अशी इथल्या प्रमुख लोकांनी मागणी केली. महिने दिड महिने याबाबत अभ्यास करत, अधिकांऱ्यांशी चर्चा करत या  ६५ गावांना ६ टीएमसी पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. 

या भागांना पाणी उपलब्ध व्हावे हे स्व. राजारामबापू यांचे स्वप्न होते. त्यांनी या भागांना पाणी मिळावे यासाठी पदयात्राही काढली होती. 

याप्रसंगी माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की, आम्ही केलेल्या मागणीचा गांभीर्याने विचार करून मंत्री जयंतराव  पाटील यांनी जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले. त्यासाठी जत तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने आभार मानतो. पाण्याची उपलब्धता ही महत्वाची होती. ती आज पूर्ण झाली. पाणी उपलब्ध करणे हे काम कठीण होते ते मंत्री महोदयांनी साध्य केले. पक्षीय मतभेद विसरून आम्ही आपल्या सत्काराला आलो आहोत. स्व. राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अर्थ संकल्पात भरीव तरतूद करून जत तालुक्याला भाग्योदय आणण्यासाठी आपण आपली सर्व शक्ती पणाला लावाल. असा मला विश्वास आहे. जत तालुक्यातील प्रत्येक गाव सिंचनाखाली येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. जत भाजपा पक्षीय जोडे बाजूला ठेवून या योजने साठी आपल्या सोबत असेल.

यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासो मुळीक, बाळासाहेब पाटील, उमेश सावंत, तालुकाध्यक्ष रमेश पाटील, चन्नाप्पा होर्तीकर, सिद्धु शिरसाठ, उत्तम चव्हाण, शिवाजी शिंदे, आप्पासाहेब पवार, भरत देशमुख, आण्णासाहेब कोडग आदी उपस्थित होते प्रसंगी उमेश सावंत, रमेश पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच गीता कोडग यांनी आभार मानले...!


TMC Water jat Jayant Patil