लवंग चगळण्याचे फायदे काय आहेत? | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० ऑगस्ट २०२१

लवंग चगळण्याचे फायदे काय आहेत? |

  • लवंग म्हणजे झाडाच्या परिपक्व न झालेल्या फुलांच्या कळ्या असतात. 

  • Syzygium aromaticum Health benefits clove

  • लवंगाचे अनेक आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ या.

  • हिवाळ्याच्या दिवसात रात्री झोपायच्या आधी लवंग चघळण्याने शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते. त्याचबरोबर हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.


  • रक्तामध्ये विषारी घटक जास्त झाल्यास लवंग खाल्ल्याने नैसर्गिकरित्या ते बाहेर पडण्यासाठी उपयोगी ठरते. रक्ताचे शुद्धीकरण झाल्यामुळे त्वचेचे अनेक आजार दूर होतात.


  • नियमित लवंग चघळण्यामुळे दातांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. दातदुखीच्या तक्रारीमध्ये लवंग दाताखाली धरावा. याच्या अर्कामुळे दातांचे आरोग्य सुधारते.


  • पोटाचे अनेक आजार आणि समस्यांसाठी लवंग फायदेशीर ठरतो. म्हणून आपल्या आहारात लवंगचा समावेश करा किंवा झोपायच्या आधी लवंग चावून घ्या.


सायनसपासून सुटका

सायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी रोज ३-४ चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इंफेक्‍शन दूर होईल आणि श्वास घेताना होणार त्रास कमी होईल.

रोगप्रतिकारक शक्ती वाढेल

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते.
Syzygium aromaticum

Health benefits clove