युट्यूब चॅनल्स, पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू करा : एस.एम.देशमुख यांची मागणी SM Deshmukh - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २८, २०२१

युट्यूब चॅनल्स, पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू करा : एस.एम.देशमुख यांची मागणी SM Deshmukhउरुळी कांचन  : महाराष्ट्र सरकारने डिजिटल मिडियासाठी पुरस्कार सुरू केला आहे.. त्याच धर्तीवर युट्यूब चॅनल्स आणि पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू कराव्यात अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.. 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद नावाचा एक स्वतंत्र सेल सुरू केला आहे. त्याच्या तालुका आणि जिल्हा स्तरावर शाखा सुरू करण्यात येत आहेत.. पुणे जिल्ह्यातील  दौड आणि हवेली तालुका शाखेचा शुभारंभ आज एस.एम.देशमुख यांच्या हस्ते उरुळी कांचन येथील मेमाणे फार्म वर करण्यात आला यावेळी पुणे जिल्हा प़मुख म्हणून जनार्दन दांडगे यांची नियुक्ती करण्यात आली.. 

आपल्या भाषणात एस.एम.देशमुख म्हणाले, पुढील काळ हा डिजिटल मिडियाचा आहे.. आज महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात किमान ५० चॅनल्स किंवा पोर्टल्स सुरू आहेत.. राज्यातील ३५० तालुक्याचा हिशोब करता राज्यात १७,५०० चॅनल्स, पोर्टल्स कार्यरत आहेत.. यातील अनेक चॅनल्सकडे एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त सबस्क़ाइबर आहेत अशा सर्व चॅनल्सना प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाप़माणेच जाहिराती मिळाल्या पाहिजेत, नव्या दमाचे तरूण पत्रकार या माध्यमात कार्यरत असले तरी स्वतःच्या खिशाला तोशीष लावून हे सर्व जण पत्रकारिता करीत आहेत.. त्यांना सरकारने जाहिरातीच्या माध्यमातून आधार देण्याची गरज आहे.. 

आर.एन.आय. प्रमाणे चॅनल्स साठी स्वतंत्र नोंदणी व्यवस्था तयार करून डिजिटल माध्यमांना अधिकृत मान्यता दिली जावी.. पुढील काळात या माध्यमाचा होणारा विस्तार लक्षात घेऊन काही अटी व शर्थीच्या अधिन राहून या माध्यमातील पत्रकारांना अधिस्वीकृती आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी देखील एस.एम.देशमुख यांनी केली आहे.. 

डिजिटल माध्यमांना सरकार आणि समाज मान्यता नाही. ती मिळवायची असेल तर या माध्यमाने आपली विश्वासार्हता वाढविली पाहिजे असे आवाहन करतानाच एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांना नवीव तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आणि आपले वेगळेपण जपण्याचे आवाहन केले, सोशल मिडिया प्रत्येकाच्या हाती असल्याने प्रत्येक व्यक्तीच आज पत्रकाराच्या भूमिकेत आहे.. त्यामुळे आपण काही वेगळे दिले नाही तर स्पर्धेत टिकू शकणार नाही असा इशारा देखील एस.एम.देशमुख यांनी दिला.. 

महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेच्या शाखा राज्यात सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात सुरू करण्यात येणार आहेत.. या संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या डिजिटल मिडियातील पत्रकारांनी परिषदेकडे संपर्क साधावा असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले.. 

              यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, सोशल मिडिया परिषदेचे राज्य प़मुख बापुसाहेब गोरे, एम.जी. शेलार, राजेंद्र काळभोर, रवींद्र खोरकर, गणेश सातव, दिपक पवार यांची भाषणे झाली.. प्रास्ताविक सुनील जगताप यांनी केले, कार्यक़मास पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, समन्वयक सुनील जगताप, परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार, पुणे जिल्हा सोशल मीडिया परिषद अध्यक्ष जनार्दन दांडगे, राज्य संघटक सुनील वाळुंज, हवेली तालुका अध्यक्ष राजेंद्र काळभोर , दौंड तालुका पत्रकार संघ अध्यक्ष रवींद्र खोरकर, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहूल शिंदे, हवेली तालुका सोशल मीडिया परिषद अध्यक्ष गणेश सातव, दौंड तालुका सोशल मीडिया परिषद अध्यक्ष दिपक पवार, जेष्ठ सल्लागार तुळशीराम घूसाळकर, प्रभाकर क्षिरसागर, दादाराव आढाव, किशोर मेमाणे, सुखदेव भोरडे, जितेंद्र आव्हाळे, रमेश वत्रे, दत्तानाना भोंगळे, जयदीप जाधव, अमोल भोसले, के.डी. गव्हाणे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख भरत निगडे आदि मान्यवरांसह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते..