भंडाऱ्याची शिवानी जाणार युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गला! - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑगस्ट २४, २०२१

भंडाऱ्याची शिवानी जाणार युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गला!

Shiwani Waladekar Bhandara The University of Edinburgh  

नागपूर दि. 24 :  परीश्रमाला जिद्द आणि चिकाटीची जोड असली तर माणसाला काहीही अशक्य नसते. भंडारा जिल्हयातील शिवानी वालदेकर या विदयार्थीनीने समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीने स्वत:ला घडविले . आता ती लंडन येथील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये मॅन्युअल स्कॅवेंजिंग याविषयी संशोधन करण्यासाठी जाणार आहे. (Shiwani Waladekar Bhandara The University of Edinburgh  )

भंडारा जिल्ह्यात एका गरीब कुटूंबात जन्मलेल्या शिवानीचे वडील गंगाधर जानूजी वालदेकर हे मजूर म्हणून हाताला पडेल ते काम करतात. आई कांचन गंगाधर वालदेकर गृहीणी आहे. आई शिकलेली डी. एड झालेली परंतु आईच्या वडीलांनी त्यांना नोकरी करु दिलेली नाही. घरात वडील एकटेच कमावते त्यांच्या मजुरीच्या भरवशावर घरचा उदरनिर्वाह चालतो. घरात तीन बहिण गरीब कुटूंब परंतु आई उच्च् शिक्षित व स्त्रीवादी विचाराची असल्यामुळे आपल्या मुलींनी फार शिकाव असे वाटायचे त्यामुळे तिन्ही मुलींना त्यांनी शिकवल कालांतराने दोन मुलींचे लग्न झाले.

सर्वात लहान शिवानी लहानपणापासूनच हुशार व तल्लख बुद्धिची होती. दहावी पर्यतचे शिक्षण शिवानीने नूतन कन्या शाळा भंडारा येथे केले त्यानंतर 11 पासुनचे तर एम ए. पर्यंतचे शिक्षण जे.एम. पटेल कॉलेज भंडारा येथे केले. शिक्षणाप्रती आत्मीयता बघून ती पुढचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेली. समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत असते त्यातूनच तिला परदेशी शिष्यवृत्तीची माहिती समजली व ती त्याचा लाभ घेण्याकरीता ती समाज कल्याण विभागाकडे तिने अर्ज सादर केला. तीची शिक्षणाबद्दची तिव्र इच्छा बघून तिला समाज कल्याण मधील कर्मचाऱ्यांनी पूरेपूर मदत केली. "वडील मजूरी करतात, परदेशात शिक्षणासाठी जाण्याबाबत कधी विचारही केला नव्हता आज समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे आणि तेही इतक्या लवकर प्रक्रिया होऊन शक्य झाले यावर विश्वासच बसत नाही डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ही प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने राबिवली त्यामुळे हे शक्य झाले. माझी लंडन येथील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये मॅन्युअल स्कॅवेंजिंग याविषयी संशोधन करण्यासाठी निवड झाली आहे. समाज कल्याण विगाच्या शिष्यवृत्तीमुळे माझे परदेशात उच्च शिक्षण घ्यायचे स्वप्न सकार झाले. असे शिवानीने सांगितले.

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीमधील 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. यावर्षी एकूण विद्यार्थ्यांपैकी 42 विद्यार्थी तर 33 विद्यार्थींनी आहेत. यामध्ये नागपूर विभागातील 23 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील 16, भंडारा जिल्ह्यातील 4, गोंदिया जिल्ह्यातील 1 व चंद्रपूर जिल्ह्यातील 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यातीलच एक म्हणजे भंडारा जिल्ह्यातील शिवानी गंगाधर वालदेकर. कारण अवघ्या काही दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्धी करणे, अर्ज स्वीकारणे, तपासणे, त्रुटीची पुर्तता करुन घेणे, गृहचौकशी करणे, सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे या सर्व बाबीचा विचार करता तसेच कोविडची परिस्थिती विचारात घेता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी देण्यात आलेली मुदतवाढ, राज्यात व देशात कोरोनाचे गंभीर संकट कमी दिवसाच्या कालावधीमध्ये अंतिम मंजूरी आदेश दिले आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या गतीशील निर्णयामुळे तसेच विभागाने यावर्षीची योजना धडाक्यात मार्गी लावलीत्यामुळे त्यांचे आभार मानले. तसेच डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट् राज्य पुणे, व समाज कल्याण विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. आत्मविश्वास आणि मेहनत नेहमीच यश मिळवून देते.