शेखर सावरबांधे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र! खा.प्रफुल्ल पटेल यांचे हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश!! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ ऑगस्ट २०२१

शेखर सावरबांधे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र! खा.प्रफुल्ल पटेल यांचे हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश!!


Shekhar Sawarbandhe Shivsena To NCP

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तसेच नागपूरचे माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी आज राष्ट्रवादी चे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांचे हस्ते राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये प्रवेश केला.

 श्री सावरबांधे यांचे नंदनवन येथील निवासस्थानी झालेल्या छोटेखानी समारंभात पार पडलेल्या या समारंभात खा.प्रफुल्ल पटेल यांचे व्यतिरिक्त निरीक्षक माजी आ. राजेन्द्र जैन, माजी आमदार दिनानाथ पडोळे,प्रविण कुंटे पाटील,ईश्वर बाळबुधे, वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, दिलीप पनकुले, शैलेन्द्र तिवारी,रवि पराते,उपाध्यक्ष रविनीश पांडे, ही नेते मंडळी उपस्थित होती.

 त्यापूर्वी सावरबांधे यांनी सकाळी मेल द्वारे मा.उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा पाठविला.

अतिशय तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयावर प्रतिक्रिया देतांना सावरबांधे यांनी सांगितले की "मला कुणाबद्दल ही तक्रार नाही. पण मागील काही दिवसांपासून पक्ष संघटनेतील सुरू असलेली कामाची पद्धत मला न समजणारी आहे. ज्यांचेकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी आहे त्या संपर्क नेत्याच्याही शब्दाला या विभागातील निर्णयासाठी किंमत नसेल तर संघटना कुणाच्या इशाऱ्यावर चालते.? अशा स्थितीत जुन्या व प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय देणे अवघड आहे म्हणून मी बाजूला होण्याचा निर्णय घेतला."

 यावेळी शिवसेनेचे अनेक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते पण त्यांचा प्रवेश नंतर होईल असे सांगण्यात आले.


Shekhar Sawarbandhe Shivsena To NCP