सागवन वृक्षाची कत्तल व तस्करी | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१९ ऑगस्ट २०२१

सागवन वृक्षाची कत्तल व तस्करी |

 गोंदिया   - सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातंर्गत येणाऱ्या शेंडा परिसरातील कोयलारी बिट मधील पुतळी व प्रधानटोला शिवारातील जंगलातून मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे. एवढेच नव्हेतर इतर लाकडांमध्ये मिश्रीत करून सागवानाची तस्करी खुल्लमखुल्ला होत आहे. मात्र, या प्रकाराकडे वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.

सड़क अर्जुनी तालुक्यातिल कोयलारी बिट क्षेत्रामधे येत आहे, कोयलारी बिट मधील पुतली व प्रधानटोला शीवारातिल मोंथा प्रमाणत सागवन झाड़ाची तस्करी केली जात आहे त्याच प्रमाने वन क्षेत्रातून सागवान लाकडे इतर जातीच्या लाकडांमध्ये मिश्रित करून खुलेआम तस्करी होत आहे. हा प्रकार जंगल शिवारातून कापलेल्या  सागवान वृक्षाच्या खुंटावरून उघडपणे दिसून येत आहे. असे असले तरी वनविभागाचे अधिकारी मात्र, या सर्व प्रकारापासून अनभिज्ञच आहे.    प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहेत.