श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने मास्क व कोरोना या विषयावर जनजागृती | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ ऑगस्ट २०२१

श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने मास्क व कोरोना या विषयावर जनजागृती |स्वातंत्र्याचा 75 व अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2021 ला देशात प्रत्येक ठिकाणी साजरा करण्यात आला. याच अमृत महोत्सवी वर्षाच्या पर्वावर श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर च्या वतीने शहरातील आंबेडकर चौक येथे आज मास्क व मिठाईचे वाटप करून चंद्रपूर शहरातील नागरिकात मास्क व कोरोना या विषयावर जनजागृती करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावर आज भरपूर प्रमाणात गर्दी दिसून आली. बहुतांश नागरिकांनी मास्क वापर केला नव्हता ज्या नागरिकांनी मार्च वापर केला नव्हता त्यांना रस्त्यात थांबवून प्रतिष्ठानच्यावतीने मास्कचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रतिष्ठानच्या वतीने सर्व समाजसेवी संस्थांना व प्रशासनाला लोकांमध्ये दिसून आलेली मानसिकता बद्दल उदासीनता दूर करण्याकरिता आवश्यक पाऊल उचलण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गाटकीने, सचिव नवीन कपूर,कोषाध्यक्ष प्रमोद वरभे, सहकोषाध्यक्ष विनोद गोवारदीपे, कुणाल खनके रुपेश महाडोळे,सचिन बरबटकर, प्रतिक लाड भागवत खटी, पंकज निमजे, पंकज नागरकर, भास्कर डांगे आशा यादव,दीप वरभे यांची उपस्थिती लाभली.