रस्त्याचे काम रेंगाळले; पत्रकाराची दुचाकी घसरली; चार जण जखमी - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑगस्ट २२, २०२१

रस्त्याचे काम रेंगाळले; पत्रकाराची दुचाकी घसरली; चार जण जखमी

शेगांव : खराब रस्त्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन त्यात  एकूण चार जण जखमी झाल्याची घटना शेगाव- नागझरी दरम्यान रविवारी दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. यात शहरातील जेष्ठ पत्रकार राजकुमार व्यास यांचा गंभीर जखमी आहेत. 

 Road Accident Reporter Bike 

रक्षाबंधनच्या दिवशी ब्राह्मण समाजामध्ये  नदीच्या काठी श्रावणीची पूजा करुन जाणव्याची तसेच ॠषी पूजा करून होमहवन केल्या जाते. त्या पुजेत  सहभागी होण्यासाठी शेगाव पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरील नागझरी शिवारातील नदीपात्राचे स्थळी जायचे होते.त्याअनुशंगाने  पत्रकार राजकुमार व्यास हे  शहरातीलच गोपाल शर्मा यांच्या  दुचाकीवर बसून श्रावणी पुजेसाठी जात असताना त्यांच्या दुचाकीला शेगाव नागझरी रस्त्यावर मध्येच अपघात झाला. यात गोपाल शर्मासह राजकुमार व्यास हे गंभीर जखमी झाले. राजकुमार व्यास यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या डोक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेदना होत होत्या आणि डोकं फुटल्याने त्यांच्या उजव्या डोळ्यावरील कपाऴाच्या जागी  सहा टाके पडले आहेत. या अपघातात सुदैवाने त्यांचा डोळा वाचला.

ही घटना घडल्यानंतर त्या परिसरात शेतात काम करीत असलेले शेतमजूर राष्ट्रपाल सरदार,निलेश मसने, मंगेश गणगणे हे शेगावकडे घरी परतत असताना त्यांना पत्रकार राजकुमार व्यास जखमी अवस्थेत पडलेले दिसले. यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांना उपचारासाठी घटनास्थऴावरुन  रुग्णालयात दुचाकीवर सोबत घेऊन आले. पत्रकार राजकुमार व्यास यांना मार लागल्याने  डोक्यातुन खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या अपघातात त्यांच्या नाकाचे हाड  फ्रॅक्चर झाले. त्यांना जेवणास अडचण येत असून सध्या फक्त लिक्वीड  स्वरूपात त्यांना अन्न घ्यावे लागणार असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे.

शहरातील पत्रकारांना या अपघाताची माहीती  समजताच सईबाई मोटे रुग्णालयात शेगाव शहरातील पत्रकारांनी धाव घेतली तसेच मातृशक्ती संघटनेच्या  सर्व महिलांनी सुद्धा त्या ठिकाणी पत्रकार राजकुमार व्यास यांच्या प्रक्रुतीबाबत माहीती घेऊन विचारपूस केली यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय सोनोने, अनिल ऊंबरकार यांनी त्या ठिकाणी येऊन पत्रकार राजकुमार व्यास यांना धीर दिला आणि शक्य ती मदत पत्रकारांच्या माध्यमातून राजकुमार व्यास यांना करण्यात येईल असे सांगितले यानंतर खामगावातील पत्रकार टीव्ही जर्नालिस्ट संघटनेचे माजी अध्यक्ष राहुल खंडारे सुद्धा खामगाव येथुन शेगावला आले आणि त्यांनी राजकुमार व्यास यांच्या नाकाचे हाड फॅक्चर असल्यामुळे त्यांना शेगाव येथून खामगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आणि पत्रकारांशी चर्चा करताना अशाप्रसंगी कुठेही अडचण निर्माण झाली तर पत्रकार राजकुमार व्यास यांना मदतीसाठी संघटनेच्या माध्यमातून धावून येऊ असे राहुल खंडारे यांनी सांगितले. 


 Road Accident Reporter Bike 

तर या ठिकाणी या अपघातात आज नागझरी शेगाव मार्गावर एकूण चार जणांना गंभीर दुखापत झालेली आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे या ठिकाणी दररोज किरकोळ अपघात घडत असतात आणि आज या ठिकाणी चार जण गंभीर जखमी झाले आहेत उद्या या ठिकाणी मोठा अपघात घडून या ठिकाणी एखादा जीव गेला तर प्रशासन जागे होईल काय? असा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे तर ठेकेदाराचे विरोधात पत्रकार लवकरच तक्रार देतील अशीसुद्धा माहिती यावेळी पत्रकारांकडून मिळाली आहे..कासवगतीने सुरु असलेले हे काम एखाद्याचे जिव गमविल्यानंतर तातडीने काम पुर्ण करणार काय?असासुध्दा प्रश्न जनता विचारत आहे.


 Road Accident Reporter Bike