स्व. राजीव गांधी यांचे थोर बलिदान देश कधीच विसरणार नाही : ना बाळासाहेब थोरात | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑगस्ट २०, २०२१

स्व. राजीव गांधी यांचे थोर बलिदान देश कधीच विसरणार नाही : ना बाळासाहेब थोरात |

 


स्व. राजीव गांधी यांचे बलिदान हा भारत देश कधीच विसरणार नाही, असे भावपूर्ण विधान महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांनी केले. आज राजीव गांधी यांच्या ७७ व्या जयंती दिनानिमित्त (Rajiv Gandhi BirthAniversary) राजीव गांधी चौक, वर्धा रोड, नागपूर येथील स्थापित पुतळ्याला पुष्पंजली अर्पण करून भावपूर्ण आदरांजली देण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी राजीव गांधी हे युवकांचे प्रेरणास्थान असलेले प्रखर राष्ट्रवादी विचारांचे महान नेते होते, या शब्दात त्यांना आदरांजली अर्पण केली.

        राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दीनानाथ पडोळे, तात्यासाहेब मते, जानबाजी मस्के, संजय शेवाळे, अशोक काटले, श्रीकांत शिवणकर, अशोक राऊत, सरदार रवींद्र मुल्ला यांनीही राजीव गांधी हे तंत्रयुगातील महान नेते होते असे विचार मांडले.

        याप्रसंगी भाईजी मोहोड, मच्छिंद्र आवळे, बबलू चौहान, प्रमोद जोंधळे, वसंत घटाटे, मंगला महाजन, अशोक माहुरकर, मोरेश्वर जाधव, राहुल येन्नावार, विनोद शेंडे, सुरज बोरकर, विजय मसराम, राजेश टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.