राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठीत : महिला व बाल विकास आयुक्त राहुल मोरे यांची माहिती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२१ ऑगस्ट २०२१

राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठीत : महिला व बाल विकास आयुक्त राहुल मोरे यांची माहिती


            मुंबईदि.२१: जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्षसदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणुकीकरिता राज्य शासनास शिफारस करण्यासाठी मा.उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती डॉ. शालिनी शशांक फणसाळकर- जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षासाठी निवड समिती गठीत करण्यात आली आहेअशी माहिती  महिला व बाल विकास आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे.
            दिनांक २३ जुलै २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 च्या नियम 90 (1) मधील तरतुदीनुसार ही निवड समिती गठित करण्यात आलेली आहे. सदर समितीवर अध्यक्षपदी डॉ. फणसाळकर- जोशी तर सदस्य म्हणून अनिरुद्ध पुरुषोत्तम पाटीलगजानन नामदेव मुंढेश्रीम. निर्मला सांमत-प्रभावळकरविकास रावजी सावंतराज्य बाल हक्क संरक्षण आयोगमुंबई आणि महिला व बाल विकास आयुक्तपुणे असे एकूण 6 सदस्य आहेत. समिती बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 (2016 चा 2) मधील तरतुदीनुसार जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्षसदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणूकी करिता राज्य शासनास शिफारस करणार आहे.