चंदनखेडा येथील कोरडवाहू क्षेत्रकारासाठी लघु उपसा सिंचन योजना सुरु करा | Pratibha Dhanorkar - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१८ ऑगस्ट २०२१

चंदनखेडा येथील कोरडवाहू क्षेत्रकारासाठी लघु उपसा सिंचन योजना सुरु करा | Pratibha Dhanorkar


आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची  जलसंधारण मंत्री  शंकर गडाख यांच्याकडे मागणी 

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ शेती करतात. येथील अनेक भागातील शेतकऱ्यांना शेतीमाल पिकविण्यासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावे लागते. अनेकदा अस्मानी व सुलतानी संकटाला सामोरे जावे लागते. या भागातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी इरई नदीवरील को. प बंधाऱ्यातील पाणी साठा उपसा करून चिंतनाखाली आणणे शक्य आहे. त्यामुळे या भागातील कोरडवाहू क्षेत्राकरिता लघु सिंचन योजना सुरु करा अशी लोकाभिमुख मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांच्याकडे केली आहे. मंत्री महोदयांनी तात्काळ हि योजना सुरु करणार असल्याचे सांगितले. 

                                          आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आग्रही असतात. भद्रावती तालूक्यातील चंदनखेडा भागातील अनेक शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती आहे. या भागात आदिवासी लाभधारक शेतकरी ५० टक्क्याहून अधिक आहेत. त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवांकरिता हि योजना येथील एक वरदान ठरणार आहे. हा प्रश्न अतिशय महत्वाच्या असून हा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांच्याकडे केली आहे. मंत्री महोदयांनी तात्काळ संबंधित सचिवाला आदेश देऊन हि योजना तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. या योजनेमुळे येथील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.