धक्कादायक:मुलगा ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष देत नाही म्हणून आईने केली मुलाची हत्या;आणि नंतर स्वतःलाही संपवले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ ऑगस्ट २०२१

धक्कादायक:मुलगा ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष देत नाही म्हणून आईने केली मुलाची हत्या;आणि नंतर स्वतःलाही संपवले

नाशिक:
नाशिकात एका आईने क्रूरतेचा कळस गाठला. तिने आपल्याच साडे तीन वर्षांच्या मुलाचे तोंड उशीने दाबून त्याचा खून केला. यानंतर काही वेळाने तिने बेडरूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कारण फक्त एवढेच होते, की तो चिमुकला ऑनलाइन क्लासमध्ये लक्ष देत नव्हता. याच रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलले अशी प्राथमिक माहिती समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पाथर्डी फाट्याजवळील साई सिद्धी अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास शिखा सागर पाठक (30) हिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. तिने एक सुसाईड नोट देखील सोडले होते. त्यामध्ये या दोन्ही मृत्यूंसाठी इतर कुणालाही जबाबदार धरू नये असे तिने सांगितले होते.
शिखा सागर पाठक आपल्या पती आणि तीन वर्षीय मुलगा रिधान सागर पाठक यांच्यासोबत राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, संध्याकाळी ती बेडरुममध्ये आपल्या मुलाला ऑनलाइन क्लासमध्ये लक्ष देण्यास सांगत होती. मात्र मुलगा लक्ष देत नाही ह्याचा तिला राग आला आणि तिने हे पाऊल उचलले.

दोघांचे मृतदेह आतून बंद असलेल्या खोलीतच सापडले. तसेच मुलाच्या नाकातून रक्त आले होते. संबंधित महिलेच्या आई-वडिलांनी सुद्धा ही हत्या तिनेच केली असे पोलिसांना सांगितले आहे.महिलेवर मानसिक उपचार सुरु असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.