भाजप आ.प्रशांत बंब यांच्याकढुन जिल्ह्याचे MIM चे खासदार इम्तियाज जलील यांचे कौतुक. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१

भाजप आ.प्रशांत बंब यांच्याकढुन जिल्ह्याचे MIM चे खासदार इम्तियाज जलील यांचे कौतुक.

औरंगाबाद - माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करतांना गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी जिल्ह्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं कौतुक केलं आहे. बंब म्हणाले खा. इम्तियाज जलील तरी एमआयएम पक्षाचे खासदार असतील तरी ते शहरात खैरे यांच्यापेक्षा काही विकासाची चांगली काम करत आहेत, हे आपण मानलं पाहिजे. जरी एमआयएम आणि आम्ही भविष्यातही विरोधक असू, पण जी चांगली काम आहेत त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, असंही बंब म्हणाले.