पोलिस भरती लवकरच होणार| सप्टेंबरमध्ये ऑफलाईन लेखी परिक्षा (Maha Police Recruitment 2021) - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१० ऑगस्ट २०२१

पोलिस भरती लवकरच होणार| सप्टेंबरमध्ये ऑफलाईन लेखी परिक्षा (Maha Police Recruitment 2021)

 


Maharashtra Police Bharti 2021

पोलिस भरती (Maha Police Recruitment 2021) लवकरच होणार आहे. सप्टेंबरमध्ये ऑफलाईन लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. आजवरच्या पोलिस भरतीत प्रारंभी मैदानी चाचणी (Ground test) होत असे, आता मात्र नव्या प्रणालीनुसार अगोदर लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. लेखी परिक्षेतून पात्र होणा-या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे .

आता पोलिस भरती लेखी परिक्षेबाबतचे शुध्दीपत्रक पोलिस खात्याकडून प्रसिध्द करण्यात आल्याने राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणारे उमेदवार आता अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत. पहिल्यांदा होणारी लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी एस.ई.बी.सी. (मराठा उमेदवार) फॉर्म भरला होता. त्या उमेदवारांना खुला प्रवर्ग किंवा ई. डब्ल्यु. एस. (आर्थिकदृष्ट्या मागास) यापैकी एक विकल्प निवडण्याची संधी दिली आहे.

हा विकल्प निवडण्याचा कालावधी 5 ते 15 ऑगस्ट असा 11 दिवसांचा असेल. ई. डब्ल्यु. एस. चे प्रमाणपत्र ही 2018-19 व 2019-20 या परीक्षांसाठी मार्च 2020 पर्यंतचे असणे आवश्यक केले आहे. त्या दृष्टीने उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून येणाऱ्या भरतीला सामोरे जावे. उमेश रूपनवर म्हणाले , महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये आयुक्तालये, ग्रामीण परीक्षेत्रे, एस.आर. पी. चे ग्रुप व रेल्वे विभाग या सर्व युनिटमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार असून, यासाठी पोलीस विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या.


 पोलीस शिपायाला परीक्षा न देता उपनिरीक्षक होण्याची संधी 


पोलीस दलात 30 वर्षे सेवा केल्यानंतर पोलीस शिपायाला परीक्षा न देता उपनिरीक्षक होण्याची शक्यता वाढल्या आहेत. तसा प्रस्ताव राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी शासनाला पाठवला आहे. मात्र पांडे यांच्या या प्रस्तावाबाबत अनेक तरुण पोलीस शिपायांनी नाराजी व्यक्त केली असून, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास अनेकांचे तरुणपणी अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहील, असे त्यांचे म्हणणे आहे.