दोन युवकांनवर प्राणघातक हल्ला; दोन युवक गंभीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ ऑगस्ट २०२१

दोन युवकांनवर प्राणघातक हल्ला; दोन युवक गंभीर
◼️आरोपी फरार ; वरोरा येथील घटना

शिरीष उगे (वरोरा/प्रतिनिधी)
: वरोरा शहरातील एकर्जूना जवळील जिजामाता वार्ड बावने लेआऊट येथे असलेल्या संकट मोचन हनुमान मंदिर परिसरात काल रात्री उशिरा पर्यंत अज्ञात आरोपीने दोघांना केलेल्या मारहाणीत अमोल बोरकुटे रा. जिजामाता वार्ड वरोरा वय 25 व प्रशांत झाडे रा. एकर्जूना वय 25 हा गंभीर जखमी झाले. ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास दिनांक 12 ऑगस्ट रोजी घडली जिजामाता वार्ड येथील रहिवासी अमोल बोरकूटे हा मंदिराच्या जवळ राहतो. घटना घडल्यानंतर अमोल जखमी अवस्थेत स्वतः चालत जात घरी पोहोचला घटनेचे गांभीर्य ओळखून आई वडील व भावाने अमोल जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले. तर अमोल बोरकुटे हा प्रशांत झाडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यास त्वरित चंद्रपूर येथे हलवण्यात आले. प्रशांत झाडे हा घरचा सदन असून अमोल रोज मजुरीचे काम करायचा काहि वर्षा आधी प्रशांत झाडे यांनी एका मुलीशी प्रेम विवाह केला होता. मात्र त्या मुलीचा मृतदेह रेल्वे लाईन वर आढळले त्या घटनेचा संबंध तर या घटनेशी असावा असा अंदाज नागरिकांत द्वारे व्यक्त केला जात आहे. झाडे यांचे काही दिवसापूर्वी प्रफुल नावाच्या व्यक्ती सोबत भांडण झाले होते. त्या भांडणाचा वचपा म्हणून तर ही घटना घडली असावी असा तर्क लावला जात आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून एक विना नंबर प्लेट असलेली निळ्या रंगाची दुचाकी दोन लोखंडी रॉड मंदिर परिसर बाहेर मंदीर पडलेले रक्ताचे नमुने पोलिसांनी जप्त केले असून अज्ञात आरोपींवर जखमी द्वारे बयाना वरून गुन्हे दाखल करण्यात येईल. अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी घटनेचा पंचनामा ठाणेदार खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मडावी व पोलीस शिपाई करीत आहे.