सावधान ! कुणालाही सांगू नका लोकेशन; होऊ शकतो घातपात - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २१, २०२१

सावधान ! कुणालाही सांगू नका लोकेशन; होऊ शकतो घातपात

होय, तुम्ही कुठे आहात, हे ठिकाणी अनोळखी असो वा ओळखीच्या व्यक्तीला सांगू नका. कारण, लोकेशन विचारून तुमच्या ठिकाणी घातपात होण्याची शक्यता असते. सध्या गुगल लोकेशन ऑन करून ठेवल्यामुळे अनेकदा विपरीत घटना घडल्या आहेत. त्यामुळे सावधान राहा आणि सुरक्षित राहा  - लोकेशन हिस्ट्री वाचवण्यासाठी डेटा अँड पर्सनलायझेशन टॅबमध्ये लोकेशन हिस्ट्रीत जाऊन सेटिंग ऑफ करा. जो फोन आणि संगणक तुम्ही वापरता त्यात हे करा, भलेही सर्वात एकच अकाउंट असो.

- जीपीएस सिग्नल्स गरज असेल तेव्हाच ऑन करा. वेब अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंगपासून वाचवण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन गुगल अकाउंटमध्ये डेटा अँड पर्सनलायझेशन टॅबवर वेब अँड अॅप अॅक्टिव्हिटी ऑफ करा.


- गुगल व्हाॅइस सर्चचा डेटाही सेव्ह ठेवते. तो आपण व्हॉइस अँड ऑडिओ अॅक्टिव्हिटी पेजमध्ये जाऊन पाहू शकतो आणि डिलीट करू शकतो.


- फोटो अपलोड करण्याआधी कॅमेरा अॅपमध्ये ऑल अॅप सेक्शनमध्ये सेटिंगमध्ये जाऊन सेव्ह लोकेशन ऑफ करा. गुगल फोटोजमध्ये मेन्यू सेटिंगमध्ये लोकेशनमध्ये जिओलोकेशन बंद करा. 


गुगल तुमच्या लोकेशनचे इस्टिमेट करते, ते बंद करण्यासाठी इस्टिमेट लोकेशन फीचर डिसेबल करणे आवश्यक आहे. त्यासाठी फोटो लायब्ररीत फोटोवर क्लिक करून इन्फो आयकॉनमध्ये रिमूव्ह लोकेशनला क्लिक करा.