☕ गवती चहा पिण्याचे फायदे काय आहेत? - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २८, २०२१

☕ गवती चहा पिण्याचे फायदे काय आहेत?

 गवती चहा  ☕ पिण्याचे फायदे काय आहेत?


गवती चहा पिण्याचे खूप सारे फायदे आहेत

प्रथम भांड्यामधे पाणी घेऊन त्यात गवती चहाचे पाने टाकून चहा उकळते, जरा वेळ झाल्यावर त्यात चहा पावडर, साखर, आणि दूध घालते, आणि एक उकळी येऊ देते असा हा माझा घट्ट दुधाचा गवती चहा तयार होतो. चहा आरोग्यासाठी चांगली की वाईट हा एक प्रश्न च आहे. कारण अनेकांची सकाळ ही एक कप चहा घेतल्याशिवाय होऊच शकत नाही. वास्तविक कोणतीही गोष्ट जर अती प्रमाणात सेवन केली तर ती शरीराला घातकच ठरते. त्याप्रमाणे चहादेखील अतीप्रमाणात घेतल्यास त्याचा त्रास होतो. मात्र दररोज एक ते दोन कप चहा घेण्यास काहीच हरकत नाही. उलट जर मसाला चहा अथवा गवती नियमित घेतला तर तो शरीरासाठी फायदेशीरच ठरतो. पावसाळ्यात गवती चहा मोठ्या प्रमाणावर उगवतो. त्यामुळे पावसाळा ते हिवाळा गवती चहा मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. शिवाय गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो. ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं.


गवती चहा पिण्यामुळे  मानसिक ताण पासून आराम मिळतो, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नक्कीच नियंत्रित राहू शकतं. आरोग्य चांगले राहते, तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 


दिवस भर कामाची दगदग, धावपळ यामुळे जर अंगदुखी,डोकेदुखी,कंबरदुखी, असेल तर गवती चहा नक्की प्या, मासिक पाळीत आराम मिळण्यासाठी गवती चहा खूप फायदेशीर आहे,

पावसाळ्यात फंगल इनफेक्शनचा त्रास वारंवार होऊ शकतो. या फंगल इनफेक्शनला टाळण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी गवती चहा पिणे आवश्यक आहे, गवती चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो,

इनफेक्शनचा धोका कमी होतो, कफ कमी होतो. 


 

धन्यवाद,