"सहकार आघाडीतर्फे मा. गौतम वालदे यांची सदिच्छा भेट" - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२७ ऑगस्ट २०२१

"सहकार आघाडीतर्फे मा. गौतम वालदे यांची सदिच्छा भेट"गौतम वालदे यांची नुकतीच नागपूर येथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था* या पदावर बदली झाली. भाजपा सहकार आघाडी नागपूर महानगर आणि मंडळ कार्यकारिणीतर्फे महानगर अध्यक्ष किशोर भागडे आणि महामंत्री अनिल देव यांच्या नेतृत्वात नुकतीच त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल रोपटे आणि सहकार दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी सहकार आघाडीतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी त्यांना सहकार क्षेत्रातील समस्यांबाबत एक निवेदन देण्यात आले आणि यावर त्यांनी भरपूर वेळ देऊन अगदी मनमोकळी चर्चा करून सध्य स्थितीत सहकारी पत संस्था चालविताना येणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासंबंधी योग्य मार्गदर्शन करून यापुढेही सहकार्याची तयारी दर्शविली, 
यावेळी सहकार आघाडी महानगर अध्यक्ष किशोर भागडे, महामंत्री अनिल देव, संपर्क प्रमुख हरिओम भद्रे, वैशाली हनोते, महिला प्रमुख दीपाली अवचट, कोषाध्यक्ष निलंय चोपडे, उपाध्यक्ष वसंतराव पाटील, दक्षिण मंडळ अध्यक्ष विश्वनाथ कुंभलकर, महामंत्री ऍड दीपाली ढोमणे, नंदेश सावरकर, पूर्व मंडळ अध्यक्ष संजय रोकडे महामंत्री निलेश रेवतकर, उत्तर मंडळ अध्यक्ष किरण रोकडे, प्रकाश धरममाळी आदी उपस्थित होते.

Gautam walde bjp meet