Facebook ने घेतली अ‍ॅक्शन । तिरस्कार आणि द्वेष (Hate Content) पसरवणाऱ्या पोस्ट्सवर कारवाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ ऑगस्ट २०२१

Facebook ने घेतली अ‍ॅक्शन । तिरस्कार आणि द्वेष (Hate Content) पसरवणाऱ्या पोस्ट्सवर कारवाई

Facebook ने घेतली अ‍ॅक्शन । तिरस्कार आणि द्वेष (Hate Content) पसरवणाऱ्या पोस्ट्सवर कारवाई 




व्हॉट्सएप, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारखा सोशल मीडिया तसेच एमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी, डिजिटल माध्यमांवरील वादग्रस्त, चुकीच्या, आक्षेपार्ह, खोट्या, द्वेषपूर्ण, मानहानीकारक आणि हिंसाचाराला चालना देणाऱ्या तपशीलाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा केली. सोशल मीडिया, ओटीटी आणि डिजिटल माध्यमांच्या या नियमांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने (Facebook) काही पोस्टविरोधात कारवाई केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तिरस्कार आणि द्वेष (Hate Content) पसरवणाऱ्या पोस्ट्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. फेसबुकने जून 2021 च्या तिमाही दरम्यान कारवाई करत एकूण 3.15 कोटी इतका कंटेट फेसबुकवरुन हटवला आहे. मार्च 2021 च्या तिमाहीमध्ये 2.52 कोटी पोस्ट हटवण्यात आल्या होत्या. कंपनीच्या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Platform) अशाप्रकारचा कंटेट कमी झाला आहे. कंपनीने एका रिपोर्टमध्ये अशी माहिती दिली आहे आता प्रत्येक 10000 कंटेटमध्ये तिरस्कार आणि द्वेष पसरवणाऱ्या कंटेटची संख्या 5 झाली आहे.

फेसबुकचे व्हाइस प्रेसिडेंट (इंटेग्रेटी) गाय रोसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2021 च्या तिमाहीमध्ये  3.15 कंटेट्सवर कारवाई करण्यात आली होती. केवळ फेसबुकच नव्हे तर इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह कंटेटवर कारवाई करण्यात आली होती. Instagram वरुन असे 98 लाख कंटेट हटवण्यात आले होते. मार्चमध्ये ही संख्या 63 लाख होती.

दरम्यान सलग तिसऱ्या तिमाहीत फेसबुकवर अशाप्रकारच्या तिरस्कार-द्वेष पसरवणाऱ्या कंटेटमध्ये घट झाली आहे. रोसेन यांनी असं म्हटलं की जेव्हापासून अशा कंटेटबाबत रिपोर्ट होण्यास सुरुवात झाली आहे, तेव्हापासून फेसबुक आणि इन्स्टावरील द्वेष, घृणा आणि तिरस्कार पसरवणारा कंटेट हटवण्यात 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की दुसऱ्या तिमाहीत द्वेषयुक्त भाषेची उपस्थिती 0.05 टक्के होती. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हा कंटेट 0.06 टक्के किंवा सहा प्रति 10,000 इतका होता. अशाप्रकारचा कंटेट ओळखण्यात आणि कंपनीची याबाबत सक्रियता वाढल्यामुळे अशा आक्षेपार्ह कंटेट कमी होण्यास मदत झाल्याचं रोसेन म्हणाले.