माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू भाजपात | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ ऑगस्ट २०२१

माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू भाजपात |


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू डॉ. रोहित माडेवार यांनी आज नागपूर येथे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. याप्रसंगी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेव इतर पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. रोहित माडेवार हे बेलदार समाज संघटनेचे पदाधिकारी असून, सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.  याप्रसंगी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,डॉ. उपेंद्रजी कोठेकर व भाजप शहर अध्यक्ष आ. प्रवीणजी दटके, सुनीलजी मित्रा,किशोरजी वानखेडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.