पर्यावरणपूरक बांबू राखीमुळे दिव्यांगांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
'बांबूटेक आणि दिव्यांग कौशल्य विकास' चा संयुक्त उपक्रमA joint venture of 'Bamboo Tech and Divyang Skills Development'
चंद्रपूर:- भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळख असलेला राखीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु राखी निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला घातक अशा प्लॅस्टिक वापर होतो. म्हणूनच पर्यावरण स्नेही बांबू राखी निर्मितीचा संकल्प करून बाबुपेठ परिसरातील 12 दिव्यांग महिला व पुरुषांनी वैशिष्ट्यपूर्ण अशा बांबू राखी बनविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे ज्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या महत्वपूर्ण संदेशासोबतच बांबू राखीमुळे दिव्यांगांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे.
बांबूटेक ग्रीन सर्व्हिसेस चे संचालक व दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष निलेश पाझारे यांच्या संकल्पनेतून सदर सामाजिक उदयमाची मुहूर्तमेढ झाली असून दिव्यांगाना चिचपल्ली जवळी जाभर्ला स्थित बांबूटेकच्या कार्यशाळेत बांबू राखी निर्मितीसाठी तसेच बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले. या बांबूच्या निर्मितीसाठी बांबू सोबतच पर्यावरणपूरक वस्तूंचा उपयोग करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रतीच्या बांबू पासून निर्मिती तसेच बांबू उद्योगाला चालना देणाऱ्या पर्यावरण स्नेही बांबू राखी निर्मितीच्या सामाजिक उदयम स्वरूपातील प्रकल्पात स्वतः दिव्यांग असलेले निलेश पाझारे यांच्या नेतृत्वात सतीश मूल्लेवार; मुन्ना खोब्रागडे, रुपेश रोहणकर, रवींद्र उपरे, सतीश कोलते, कल्पना शिंदे, दर्शना चाफले, भाग्यश्री कोलते, किरण करमणकर हे दिव्यांग बांबू कारागीर राखी बनवण्यापासून ते विक्रीपर्यंत चे कार्य करीत असून आत्मनिर्भर दिव्यांग या संकल्पनेला सक्रिय सहकार्य करण्याचे आवहान बांबूटेक ग्रीन सर्व्हिसेस आणि दिव्यांग कौशल्य विकास संस्थेच्या वतीने निलेश पाझारे, अन्नपूर्णा धुर्वे (बावनकर) यांनी केले आहे.