जागतिक मैत्री दिना निमित्त इको प्रो तर्फे वृक्षारोपण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०२ ऑगस्ट २०२१

जागतिक मैत्री दिना निमित्त इको प्रो तर्फे वृक्षारोपण


*भद्रावती इको-प्रो चा उपक्रमशिरीष उगे (भद्रावती/प्रतिनिधी)
:जगात सर्वात निर्मळ व विश्वासाचे नाते म्हणजे मित्रत्वाचे नाते, मैत्री चे नाते हे केवळ मानवा मानवा पुरते सीमित नसून ते पक्ष्यांशी, प्राण्यांशी, वृक्षांशी व फुलांशी असते. मित्रत्वाचे नाते जपण्यासाठी वेळ प्रसंगी जीवाची परवा केली जात नाही.

मित्रांमध्ये आप आपसात प्रेम असते , एकमेकांबद्दल आदर असतो , एकमेकांबद्दल चिंता असते आणि एक खरा मित्र प्रत्येक संकटात त्याच्या मित्राला नक्कीच मदत करतो. शालेय जीवनापासून ते वृद्धापकाळ पर्यंत, जवळजवळ प्रत्येकाचे प्रत्येक ठिकाणी काही ना काही मित्र असतात. मैत्रीला साजरी करण्यासाठी, दरवर्षी ऑगस्टचा पहिला रविवार मैत्री दिन म्हणजेच friendship day म्हणून साजरा केला जातो.

याच मैत्री दिनाचे औचित्त साधून पर्यावरण क्षेत्रात काम करणारी स्थानिक इको प्रो सदस्यांनी निसर्गाशी असलेले मैत्रीचे नाते जपण्याकरिता लक्ष्मीनगर येथील ओपनस्पेस मधे निम, आवळा, जांभूळ, कवट अश्या पशुपक्षांना आकर्षित करणारे वृक्ष लावून मैत्रीदिन साजरा केला व निसर्गाशी असलेले मैत्री चे नाते जपण्याची शपथ घेतली.
याप्रसंगी लक्ष्मी नगर पांडव वॉर्ड येथील बोढे मॅडम, माधुरी बादुरकर, सुषमा घोटेकर, अनु टाले, वैशाली ढोके, शंकर घोटेकर, दिपेश गुरनुले, मनोज बादुरकर, केशव बोन्डे, नत्थुजी ढोके तसेच इको प्रो तर्फे संदीप जीवने, किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर ,शुभम मेश्राम, दिपक कावटे उपस्तित होते.