लग्नाच्या वरातीत डीजे लावून मिरवणूक; गुन्हा दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ ऑगस्ट २०२१

लग्नाच्या वरातीत डीजे लावून मिरवणूक; गुन्हा दाखल

 जुन्नर /आनंद कांबळे

 जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे लग्नाची वरात धुमधडाक्यात केल्या प्रकरणीमाजी जि.प अध्यक्षावर गुन्हा दाखल केला.

 याबाबतची हकिकत अशी की ,शनिवारी रात्री देवराम लांडे यांनी केवाडी गावात आपल्या दोन्ही मुलाची लग्न वरात काढली होती. 

याकरिता  जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेशलागू असताना वत्यांना डी .जे न लावणे बाबत नोटिस देवून सुद्धा  केवाडी गावाता सुमारे ७०० लोक जमा करुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन डी .जे सिस्टीम विना परवाना चालू ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवि १८८,२६९,२७९ तसेच पोलिस अधिनियम ३७(१)(३),१३५,१३१,३३n प्रमाणे गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस अंमलदार गणेश जोरी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पाटील करत आहेत.


file vedio