हातावरची मेहंदी मिटण्याआधीच तिच्या आयुष्याची दोर तुटली | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ ऑगस्ट २०२१

हातावरची मेहंदी मिटण्याआधीच तिच्या आयुष्याची दोर तुटली |

 नागपूर/ प्रतिनिधी : 

विवाहापासून तो दारू प्यायला लागला. अतिमद्यप्राशनातून पत्नीसोबत भांडण करून मारहाण करायचा. तरुणीच्या हातावरची मेहंदी मिटण्याआधीच तिच्या आयुष्याची दोर तुटली. त्याने दारूच्या नशेत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक घाडगे (३०, रा. सुरादेवी, कोराडी) असे मृत युवकाचे नाव आहे. चुन्नालाल घाडगे यांना दोन मुले. दीपक हा लहान मुलगा असून, त्याला दारूचे व्यसन जडले होते. दारू पिऊन नेहमी घरात धिंगाणा घालण्याची सवय त्याला लागली होती. त्यामुळे पन्नालाल यांनी मोठ्या मुलाऐवजी लहान असलेल्या दीपकचे वर्धा येथील युवतीशी लग्न लावून दिले. तो दारू प्यायचा आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तो क्रेनवर साखळी सांभाळायचे काम करीत होता. मंगळवारी सायंकाळी दीपक दारू पिऊन घरी आला. त्याने आई-वडिलांना शिवीगाळ केली. घरात तोडफोड करायला लागला. त्यामुळे चुन्नालाल यांनी पत्नी, सून आणि मुलाला घेऊन कोराडीत राहणाऱ्या चुलत भावाकडे राहायला गेले. यादरम्यान दीपकने घरात गळफास लावून आत्महत्या केली.  Crime News Khabarbat MH