भाजी कापण्याच्या चाकूने गळ्यावर सपासप वार; तोंडावर हातोडा मारून केली महिला भंतेजीची हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ ऑगस्ट २०२१

भाजी कापण्याच्या चाकूने गळ्यावर सपासप वार; तोंडावर हातोडा मारून केली महिला भंतेजीची हत्या



नागपूर : भंते भदंत धम्मानंद थेरो यांनी भंते सामनेर बुद्ध प्रियावर उर्फ कुसुम सुनील चव्हाण (वय ४५) भाजी कापण्याच्या चाकूने गळ्यावर सपासप वार करुन तोंडावर हातोडा मारून हत्या केली. घटनास्थळावरून चाकू, हातोडा जप्त करण्यात आला. आरोपी बोधी धम्मानंद थेरो यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली. 

सामनेर बुद्ध प्रिया  हि इंदिरा नगर पेट्रोल पंप जवळ जरीपटका पोलिस स्टेशन समोर नागपूर येथील रहिवासी आहे. खापरखेडा परिसरातील पिपळा डाकबंगला येथे शिवली बोधी भिख्खू निवास येथे ती राहायची. शिवली बोधी भिक्कू निवास २०१७ पासून पिंपळा डाग बंगला येथे लोकवर्गणीच्या माध्यमातून सुरू आले. भदंत धम्मानंद थेरो उर्फ रामदास झिनुजी मेश्राम (वय ५८ वर्ष रा. पिंपळा डाग बंगला,मुळ गांव यशोधरा नगर संजय गांधी नगर वार्ड नंबर 2 फेजपुर अमरावती)  यांनी बुद्धप्रिया पलंगावर झोपल्याची संधी साधून भाजी कापण्याच्या चाकूने मारले. तोंडावर डोक्यावर हातोडा मारून हत्या केली. खापरखेडा पोलिस ठाण्याचे उमेश ठाकरे, नूमान शेख यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचले. 

Crime News Budhdhpriya