नवनियुक्त सभापतीनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला | Cmc Zone Sabhapati Chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१० ऑगस्ट २०२१

नवनियुक्त सभापतीनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला | Cmc Zone Sabhapati Chandrapur



तिन्ही झोन सभापतींनी पदभार स्वीकारला

चंद्रपूर, ता. १० : २०२१-२२ साठी चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती क्रमांक एक, दोन आणि तीनच्या तिन्ही नवनियुक्त सभापतीनी आपल्या पदाचा कार्यभार मंगळवारी (ता. १०) झोन कार्यालयात स्वीकारला.

सभापतींच्या निवडीसाठी गुरुवार ता. ५ ऑगस्ट रोजी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यात प्रभाग समिती क्रमांक एकच्या सभापतिपदी छबू वैरागडे, प्रभाग दोनच्या सभापतिपदी खुशबू चौधरी आणि प्रभाग तीनच्या सभापतीपदी अली अहमद मन्सूर यांची निवड झाली. 


मंगळवारी (ता. १०) रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजपचे नेते प्रमोद कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग समिती क्रमांक एकच्या सभापती छबू वैरागडे, प्रभाग दोनच्या सभापती खुशबू चौधरी यांचा पदग्रहण सोहळा पार पडला.




 तसेच प्रभाग तीनचे सभापती अली अहमद मन्सूर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहरध्यक्ष रामू तिवारी, नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेविका सुनीता लोढीया यांच्या उपस्थितीत पदग्रहण केले.



पदग्रहणानंतर झोनचे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सहायक आयुक्त शीतल वाकडे, सहायक आयुक्त विद्या पाटील यांनी आपापल्या झोनच्या सभापतींना शुभेच्छा दिल्या.

Cmc Zone Sabhapati Chandrapur