विद्युत व्यवस्था व सांडपाणी वाहून नेण्यासाठी शहरात भूमिगत व्यवस्था करणार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑगस्ट १७, २०२१

विद्युत व्यवस्था व सांडपाणी वाहून नेण्यासाठी शहरात भूमिगत व्यवस्था करणार

आमदार सुभाष धोटे यांची घोषणा
शहराशी असलेले नाते जपणार

राजुरा/ राजुरा शहराशी माझे कौटुंबिक नाते आहे. माझे वडील स्वर्गीय रामचंद्रराव धोटे हे राजुरा नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष होते त्यानंतर आमदार झाले. त्यामुळे आमचे संपूर्ण आयुष्य राजुरा शहरात गेलेले आहे. या शहराशी आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत . शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात शहराचा सर्वांगीण विकास होत आहे.येणाऱ्या काळात शहरातील संपूर्ण विद्युत व्यवस्था व सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था भूमिगत करण्यात येईल यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. असे आश्वासन आमदार सुभाष धोटे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले .

७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरपालिका प्रांगणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुभाष धोटे बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्ष अरुण धोटे,उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, शब्बीर भाई, काँग्रेस चे अध्यक्ष रंजन लांडे, कुंदा जेणेकर,माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, रमेश नले, विलास बोंगिरवर, राधेश्याम अडनिया, हर्जीत सिंग, आनंद दासरी, संध्या चांदेकर,राजू डोहे, प्रभाकर येरणे, छोटू सोमालकर नगर सेवक व शहरातील व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थिती होती.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मागील पाच वर्षात झालेल्या विविध कामांचा उल्लेख नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केला. शहरातील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने दिले आहे. शिवाय स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहराचे सौंदर्यकरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून येत्या दोन महिन्यात शहरातील मोठे प्रकल्प लोकार्पण होईल. या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदरी करण्यात भर पडेल .असे प्रतिपादन नगराध्यक्ष धोटे यांनी आपल्या व्यक्त केले आहे. ध्वजारोहणानंतर आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते स्वर्गीय रामचंद्रराव धोटे बॅडमिंटन सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. नगरपालिकेच्या वतीने उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी बॅडमिंटन हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. कार्यक्रमाला कार्यकर्ते, नप कर्मचारी, शिक्षक वृंद इत्यादि हजर होते. कार्यक्रमाचे संचालन विजय जांभूळकर यांनी केले.

The city will make underground arrangements