पैशांची मागणी करणाऱ्या दलालापासून सावध राहा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३० ऑगस्ट २०२१

पैशांची मागणी करणाऱ्या दलालापासून सावध राहाचंद्रपूर दि.30 ऑगस्ट : जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये समाजकल्याण कार्यालयास कार्यालयीन यंत्रणा घोषित करून चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड-19 आजारास प्रतिबंध व नियंत्रणाच्या व्यवस्थेकरिता कोरोना देखभाल केंद्र सुरू करण्यात आले आहे. या देखभाल केंद्राकरीता समाजकल्याण कार्यालयाकडून बाह्यस्रोताद्वारे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर विविध सेवा घेण्यात आल्या आहेत. त्याकरीता सदर कामांसाठी बाह्यस्रोत कंपन्यांची नियुक्ती करून त्याद्वारे मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे.


सदर केंद्रावर नियुक्ती करतांना या कार्यालयाकडून कोणतीही रक्कम स्वीकारण्यात येत नाही तसेच कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी करण्यात येत नाही. त्यामुळे पैशांची मागणी करणारे व्यक्ती, मध्यस्थ, दलाल यांच्यापासून सावध राहावे व होणाऱ्या फसवणुकीस टाळावे. उमेदवारास नियुक्त होतांना पैशांची मागणी करण्यात आल्यास या कार्यालयात रीतसर तक्रार करावी. अशा व्यक्ती, कंपनी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.