Breaking News - खराडी येथे भंडारा झाला अंण ७० टक्के लोकांना जेवणातून विषबाधा? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ ऑगस्ट २०२१

Breaking News - खराडी येथे भंडारा झाला अंण ७० टक्के लोकांना जेवणातून विषबाधा?

औरंगाबाद - गंगापूर तालुक्यातील खराडी गावात भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे तब्बल शेकडो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान याच भंडाऱ्याच्या कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये गावातील जवळपास ७० टक्के लोकांना विषबाधा झाली आहे. यामुळे गावात व परिसरात एकच मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अधिक माहिती अशी की तुर्काबाद खराडी येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील सर्व लोकांना भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, याच भंडाऱ्याच्या जेवणातून ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे. विषबाधा होण्याचं कारण काय असावं? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या विषबाधेत गावातील शेकडो लोकांची प्रकृती बिघडली आहे