पैठण भुमी अभिलेख कार्यालय बनले भ्रष्टाचाराचे माहेरघर, सर्वेअरला ९० हजारांची लाच घेतांना अटक. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० ऑगस्ट २०२१

पैठण भुमी अभिलेख कार्यालय बनले भ्रष्टाचाराचे माहेरघर, सर्वेअरला ९० हजारांची लाच घेतांना अटक.

औरंगाबाद - टेबलाखालून काही तरी दिल्याशिवाय पैठणच्या उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात कुठलाच कागद पुढे सरकत नाही अशी परिस्थिती आहे. याची प्रचिती पैठण तालुक्यातील नागरिक, शेतकऱ्यांना वेळोवेळी आलेली आहे. काही दिवसापूर्वीच या कार्यालयाचे चक्क उपअधिक्षक लाच घेताना अडकले असतांना आता पुन्हा पैठण भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअर (लोकसेवक) ९० हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. सदरची कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.