राज्यात पुढील २४ तासांत अती मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० ऑगस्ट २०२१

राज्यात पुढील २४ तासांत अती मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा.


नवी मुंबई -  राज्यात पावसाने दोन ते तीन आठवडे दडी मारल्यानंतर आता राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पुढील २४ तासांमध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे.