राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हतनूर येथे विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२३ ऑगस्ट २०२१

राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हतनूर येथे विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा.

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील हतनूर येथील राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नामविस्तार दिनाचे महत्त्व प्राचार्य डॉ. किरण शिंदे यांनी सविस्तर विषद केले. विद्यापीठात राबविण्यात येत असलेली स्वच्छ विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ
 ही संकल्पना प्रत्यक्षात महाविद्यालयात राबविण्यासाठी, स्वच्छ महाविद्यालय, सुंदर महाविद्यालय ही संकल्पना राबविण्याचे ठरविले, महाविद्यालयाचा परिसर आता प्लास्टिक व कचरा मुक्त ठेवण्याची शपथ घेण्यात आली.  कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. किरण शिंदे, डॉ. राधाकृष्ण अकोलकर, प्रा. रवींद्र जाधव, प्रा. ऋषिकेश अकोलकर, प्रा. प्रवीण उघडे, प्रा. नितीन चव्हाण, प्रा. प्रवीण कुलकर्णी, अमोल फुलारे, पवन अकोलकर, रमेश गुंजाळ. यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.