हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या पदाधिकाऱ्यांची कुरआन व हदीस फेस्टिव्हल ला सदिच्छा भेट. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑगस्ट १७, २०२१

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या पदाधिकाऱ्यांची कुरआन व हदीस फेस्टिव्हल ला सदिच्छा भेट.

औरंगाबाद - अब्बास फँक्शन हॉल रौशन गेट औरंगाबाद येथे दिनांक 13 ऑगस्ट ता 25 ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या कुरआन व हदीस  फेस्टिव्हल ला हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम आणि नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन यांनी सदिच्छा भेट दिली. कुरआन हाऊस व यस्सरनल कुरआन एज्युकेशनल संस्था च्या बॅनर खाली सुरू असलेल्या भव्यदिव्य कुरआन व हदीस  फेस्टिव्हल ला आज भेट दिली व उद्देश जाणून घेतले.यावेळी यस्सरनल कुरआन एज्युकेशनल संस्था चे हाफिज उमर साहब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांना प्रेषित मुहम्मद (मुहम्मद सर्वासाठी) हे पुस्तक भेट(तोहफा)दिली. यावेळी शेख अब्दुल रहीम यांनी सर्व आयोजकांचे आभार मानले व या फेस्टिव्हल साठी शुभेच्छा दिल्या.