वरोरा येथून सावंगी (मेघे) रुग्णालयाकरिता मोफत बस सेवेचा प्रारंभ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ ऑगस्ट २०२१

वरोरा येथून सावंगी (मेघे) रुग्णालयाकरिता मोफत बस सेवेचा प्रारंभआमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी

शिरीष उगे वरोरा/प्रतिनिधी
 : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा यांचे सौजन्याने वरोरा विधान सभेतील रुग्णांना सावंगी (मेघे) येथे तपासणी व उपचारासाठी जाणे - येणे करण्यासाठी आज ९ ऑगस्ट २०२१ पासून मोफत बस सेवेचा शुभारंभ आमदार प्रतिभाताई धानोरकर याचे शुभहस्ते करण्यात आला. 
                         हि मोफत बससेवा या परिसरातील गरीब प्रवर्गातील रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असून सोमवार ते शनिवार सकाळी ८ वाजता हि बस आंबेडकर चौक वरोरा येथून रुग्णांसाठी उपलब्ध राहणार आहे. व सायंकाळी ५ वाजता  सावंगी (मेघे)  वरून परत वरोरा येथे येणार आहे. तसेच भद्रावती येथून सावंगी (मेघे) करीता सोमवार शनिवार सकाळी ७.३० वाजता मार्गे माढेळी जाणार आहे. 
                                    या बससेवेचा शुभारंभ वरोरा विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे लोकसंपर्क अधिकारी एन. पी. शिगणे, कुत्तरमारे, मिलींद भोयर, बसंत सिह, राजू चिकटे, प्रमोद मगरे, सुभाष दांदडे, मनोहर स्वामी, प्रवीण काकडे, देवडे, राजू महाजन यांची उपस्थिती होती.