केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवतराव कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा कन्नड येथे समारोप होणार. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवतराव कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा कन्नड येथे समारोप होणार.


देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ. भागवतराव कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप कन्नड येथे येथे होणार असल्याची माहिती आज (शुक्रवारी) भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी दिली. कन्नड शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात तालुका भाजपाची महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ.भागवतराव कराड यांच्या दौऱ्याची रुपरेषा तसेच नियोजन करण्यात आले.
तसेच कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील संपुर्ण बुथची रचना करणे संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीसाठी ग्रामीण जिल्हा भाजपाचे संघटन सरचिटणीस लक्ष्मणराव औटी,जिल्हा उपाध्यक्ष तथा बुथ रचनेचे लोकसभा मतदारसंघाचे संयोजक संजय खंबायते, भाजपा जिल्हा सचिव डॉ संजय गव्हाणे, तालुका अध्यक्ष भगवान कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार, रमेश जाधव, पंचायत समिती उपसभापती सुनील निकम, काकासाहेब तायडे, नंदू ढोले, शहराध्यक्ष सुरेश डोळस, भाजयुमो तालुका अध्यक्ष प्रदीप बोडखे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस गणेश घुगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत अग्रवाल, रमेश मामा नागरे, अजबसिंग राजपुत, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष अर्चनाताई पवार, आदींसह कन्नड तालुका भाजपचे पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सुत्र संचालन सुभाष काळे यांनी केले तर आभार राजेंद्र गव्हाने यांनी मानले.