शेतकरी कृती समिती जिल्हा समन्वयक यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव - देवेंद्र पाटील व मंगेश भोईटे यांनी केला सत्कार. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑगस्ट १९, २०२१

शेतकरी कृती समिती जिल्हा समन्वयक यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव - देवेंद्र पाटील व मंगेश भोईटे यांनी केला सत्कार.

जळगांव - शेतकरी कृती समिती,जळगांव चे जिल्हा समन्वयक,सामाजिक कार्यात अग्रणी,कोरोना काळात तालुक्यातील रुग्णांसाठी अद्यायावत सेवा उपलब्ध करुन देण्याबरोबरच आॕक्सिजन प्लांट निर्मीतीसाठी व आॕक्सिजन सिलेंडरसाठी तसेच इतर सुविधा प्रशासनास लोकवर्गणीच्या माध्यमातून  संकलन करण्यात पुढाकार घेतल्या बद्दल तसेच २०१९ च्या सातारा,सांगली व २०२१ कोकण पुरग्रस्त भागात भरीव मदतनिधी पाठविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नुकताच त्यांनी केलेल्या सेवा कार्या बद्दल संवेदनाशील शेतकरी नेते नानासो.एस.बी.पाटील यांचा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील (मंत्री- पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,महाराष्ट्र राज्य) तसे जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत (जिल्हाधिकारी-जळगांव) यांचे शुभहस्ते त्यांनी केलेल्या निरपेक्ष कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

          त्यानिमित्ताने त्यांचे श्री.देवेंन्द्र भास्कर  पाटील सर (मा.संचालक- ग.स,सोसायटी,जळगांव तथा सरचिटणिस- जळगांव जिल्हाअखिल.भारतीय प्राथमिक शिक्षक संघ) तसेच मंगेश रमेश भोईटे (मा.तज्ञसंचालक- ग.स.सोसायटी,जळगांव तथा अध्यक्ष- चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक संघ जि.जळगाव) आदींनी अभिनंदन केले आहे