खासदार इम्तियाज जलील केंद्रिय शहरी विकास समितीच्या पुर्वनियोजित दौऱ्यास रवाना. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१८ ऑगस्ट २०२१

खासदार इम्तियाज जलील केंद्रिय शहरी विकास समितीच्या पुर्वनियोजित दौऱ्यास रवाना.

औरंगाबाद - लोकसभा खासदार इम्तियाज जलील केंद्र सरकारच्या शहरी विकास समिती (सेंट्रल अर्बन डेव्हल्पमेंट कमिटी) चे सदस्य असुन दिनांक 18 ते 25 ऑगस्ट 2021 दरम्यान केंद्रिय समितीचा कश्मीर राज्यात विविध विकासात्मक मुद्यांवर पुर्वनियोजित दौरा असुन त्यात ते सहभागी होणार आहे. तसेच खासदार इम्तियाज जलील केंद्रिय नागरी उड्डाण समितीचे सुध्दा सदस्य असुन दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी दिल्ली येथे महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मराठवाडा व औरंगाबाद विमानतळा संदर्भातील विविध विकासात्मक प्रकल्प, प्रस्ताव व मुद्दे मांडण्यासाठी सदरील बैठकीत उपस्थित राहणार आहे.