कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३१ ऑगस्ट २०२१

कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प.

चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याने ही वाहतूक ठप्प झाली असून, अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत. 


औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्या आहेत रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच असल्याने नागरिकांनी चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गाने प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.